नैतिक प्राणी (भाग १)
प्रस्तावना: एखाद्या माणसाच्या गुणधर्मांपैकी कोणते आनुवंशिक असतात आणि कोणते संगोपनामधून आणि संस्कारामधून घडतात, हा एक जुनाच प्रश्न आहे. स्वभाव विरुद्ध संस्कार (Nature versus Nurture) ह्या नावाने तो अनेकदा मांडला जातो. सुट्या माणसांच्या पातळीवर प्रश्न असा असतो —- “ह्या व्यक्तीचे कोणते गुण आईवडलांकडून आनुवंशिकतेने आलेले आहेत आणि कोणते पालनपोषणाच्या काळात संस्कार झाल्याने रुजले आहेत?’ पूर्ण मानवजातीच्या …